जम्मू आणि काश्मीर येथील मतदारांनी निवडणुकीचा उत्सव उत्तम प्रकारे साजरा झाला. याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले. आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहोत. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत, त्यापैकी ४.९८ कोटी पुरुष मतदार आहेत तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिली.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मागणी करण्यात आली होती

तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो तर त्याचा आकार वाढवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती

तर आम्ही ती मागणी मान्य केली आहे

तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे मोठा दिसेल

पिपाणीला बंदी नाही

सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व रिसोर्स वापरतील.

लाइनच्यामध्ये खुर्ची आणि बेंच ठेवणार आहे. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर होईल.

ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी ८५ वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडीओग्राफी केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *