kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सगळ्यात मोठी बातमी !! ईडीकडून राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल

नॅशनल हेराल्डमधील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन दुबे तसेच अन्य लोकांचीही नावे आहेत. असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर काँग्रेस पक्ष कायदेशीर सल्ला घेत आहे. वकिलांकडून योग्य तो सल्ला घेऊन राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच काँग्रेस पक्ष आपली भूमिका न्यायालयात मांडणार आहे.

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत असोशिएडेट जर्नल्स लिमिटेड तसेच यंग इंडियाची साधारण 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलेली आहे. कोट्यवधींची ही संपत्ती ही वाममार्गाने जमवलेली आहे, असा आरोप आहे. याच आरोपाअंतर्गत ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत दिल्ली, मुंबई आणि लखनौ येते ही जप्तीची कारवाई केलेली आहे. यातील एकूण 661.69 कोटी रुपयांची संपत्ती ही असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि 90.21 कोटी रुपयांची संपत्ती ही यंग इंडियाशी संबंधित आहे.

ईडीने 2014 साली दिल्लीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांच्या आदेशानंतर असोशिएडेट जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियाविरोधात पिएमएलए कायद्याअंतर्गत तपास चालू केला होता. याच प्रकरणात याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झालेली आहे. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडीस, मोतीलाल वोहरा, सुमन दुपे आरोपी आहेत.