kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं- चांदी ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!

लग्नसराई चालू झाली आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आता जागतिक पातळीवर बदललेल्या परिस्थितीमुळे भारतात सोने आणि चांदीचा दर घसरला आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यासाठी दागिने खरेदी करणाच्या विचार करत असलेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासा असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या भावात ५ हजार ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव ७४ हजार ५०० रुपयांपर्यत खाली आला होता. तर, चांदी ११ हजार रुपयांनी स्वस्त झाली. दरम्यान, ३० ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत सोने- चांदीचा भाव किती होता? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

३० ऑक्टोबर: सोने- ८० हजार २०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- १ लाख रुपये (प्रतिकिलो)

५ नोव्हेंबर: सोने- ७९ हजार ४०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ९५ हजार ५०० रुपये (प्रतिकिलो)

११ नोव्हेंबर: सोने- ७७ हजार ३०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ९१ हजार ८०० रुपये (प्रतिकिलो)

१२ नोव्हेंबर: सोने- ७५ हजार ८०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ९० हजार ५०० रुपये (प्रतिकिलो)

१३ नोव्हेंबर: सोने-७५ हजार ६०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ९० हजार ८०० रुपये (प्रतिकिलो)

१४ नोव्हेंबर: सोने- ७४ हजार ५०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ८९ हजार रुपये (प्रतिकिलो)