Breaking News

माझ्या लाडक्या बहिणी आई .. – पल्लवी फडणीस,भोर भाजपा महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षा

माझ्या लाडक्या बहिणी आई बायांनो कोणत्या तोंडाने मी तुमचे आभार मानू ,आणि का मानू,मी ही तुमच्यासारखीच एक स्त्री कधी प्रेमाने ,कधी त्वेषाने,कधी रागाने ,कधी मूक स्वरुपात व्यक्त होणारी ,पण ते यासाठीच की कुठे तरी देव,देश ,धर्म,राष्ट्र करीत असताना ,माहीत होणाऱ्या गोष्टी त्यांची कारणे ,परिणाम माहीत असतात त्यामुळे कुठून तरी तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असते ,हे करीत असताना कोणाचे मन दुखावले असेल तर सर्वात आधी सर्वांची माफी मागते आणि उद्देश सांगते..

 आजचा महाराष्ट्राचा विधानसभा निकाल पाहताना सर्वात प्रकर्षांने जाणवले ते लाडकी बहीण तर आहोतच ,पण धर्म ,राष्ट्र विचार करून तुम्ही जो कौल दिलाय तो खरेच अविश्वसनीय आहे,मदतानाची टक्केवारी तर वाढली ती पाहत असताना प्रत्येक स्तरावरून अनेक राजकीय ,सामाजिक, अध्यात्मिक ,सार्वजनिक ,शाळांमधून आव्हान जाणीव करून देत असताना सर्वच तळागाळातील अगदी अज्ञानी ते उच्चशिक्षित वर्गाने आपले योगदान दिले , RSS चे योगदान तर अवर्णनीय आणि अतिशय चोख झाले ह्या सर्व लोकांचे योगदान पाहता नक्कीच आपण एक महान ,अशी महासत्ता बनू शकतो हा विश्वास निर्माण झालाय . 

  एक कार्यकर्ती,पदाधिकारी त्या आधी एक सामान्य नागरिक म्हणून सांगते आज जे लोक सत्तेत आले आहेत त्यांच्या कार्याला सहकार्य करीत असताना तळागाळातील लोकांच्या समस्या ,त्यांची कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू ,तुम्ही तुमच्या मतातून जो विश्वास दाखविला तो पूर्णत्वाला नेणे आमची जबाबदारी आहे नव्हे कर्तव्यच आहे. 

सर्व विजयी उमेदवार मतदारांचे आभार पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे लढले त्यांची ही मदतच झाली आहे त्यांचे ही आभार !

आजपासून आपण एक नवीन राज्य ,नवनिर्माण असे विचार पुढे नेत असताना एक सक्षम नागरिक ,सक्षम गाव,शहर,तालुका ,जिल्हा राज्य करणे ही जबाबदारी आपली सर्वांची आहे आम्ही माध्यमे आहोत आणि ह्या माध्यमांना तुमच्या प्रेमाची विश्वासाची मतांची साथ मिळालीय त्यामुळे एक नवऊर्जा मिळालीय तीच ऊर्जा आम्हा सर्वांकडून अखंडपणे देव,देश ,धर्म ,राष्ट्र रक्षण ,उन्नती ,सक्षम करण्याचे कार्य करून घेईल अशी आशा व्यक्त करते आणि ,भाजपा ,महायुतीकडून तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते
****
आपलीच एक लाडकी बहीण
पल्लवी फडणीस,भोर भाजपा महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *