Breaking News

पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! वाचा सर्व माहिती ..

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर १३ ते १९ जानेवारी दरम्यान पहिल्या वहिला खो-खो विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात सामने होणार असून, सर्व चाहत्यांना हे सामने पहायला मिळणार आहेत. ही स्पर्धा खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

१३ जानेवारी २०२५ रोजी इंदिरा गांधी मैदानावर ‘खो-खो विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा’ पार पडणार आहे. यावेळी, भारत विरुद्ध नेपाळ असा पहिला उदघाटनाचा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सामने सुरु होती. पहिल्या सामन्यात भारताची गाठ नेपाळशी पडणार आहे. साखळी सामने १६ जानेवारीस संपतील. त्यानंतर १७ जानेवारीपासून प्लेऑफ फेरी सुरू होईल. पुरुषांची अंतिम लढत १९ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वाजता होईल. या लढतीने स्पर्धेचा रोमहर्षक समारोप होईल. महिलांचा सलामीचा सामना १४ जानेवारीस सकाळी ११.४५ वाजता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळविण्यात येईल. भारतीय महिला संघाचा पहिला सामना १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता दक्षिण कोरियाशी होईल. महिला गटाचेही साखळी सामने १६ जानेवारीस संपतील. १७ जानेवारीस प्लेऑफ लढती होईल. महिला अंतिम सामना १९ जानेवारीस संध्याकाळी ७ वाजता खेळविण्यात येईल.

स्टार स्पोर्ट्सवरून हे सामने स्टार स्पोर्ट्स १ एचडी आणि स्टार स्पोर्ट्स फर्स्ट या वाहिनीवरून थेट प्रसारित करण्यात येणार आहेत. दूरदर्शनवरूनही या सामन्यांचे थेट प्रसारण दाखवण्यात येईल. त्याचवेळी डिस्ने हॉटस्टार या ओटीटीवरुनही सामने बघायला मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *