आयसीसीने मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली बांगलादेशची महिला क्रिकेटपटू शोहेली अख्तर हिच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. अख्तर ही २०२३ च्या महिला टी-२० विश्वचषकादरम्यान मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न करणे, लाच देणे आणि आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेला सहकार्य न केल्याबद्दल दोषी आढळली. तसेच आयसीआयसीने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
बांगलादेशकडून केवळ दोन वनडे आणि १३ टी-२० सामने खेळलेल्या शोहेली अख्तरने संहितेच्या कलम २.१.१, २.१.३, २.१.४, २.४.४ आणि २.४.७ चे उल्लंघन केल्याचा आरोप मान्य केला. १० फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणारा पाच वर्षांचा बंदीचा कालावधीही तिने स्वीकारला.
शोहेली अख्तर २०२२ मध्ये बांगलादेशकडून शेवटचा सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने बांगलादेशकडून एकूण ११ विकेट्स घेतले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे, शोहेली अख्तरने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-२० विश्वचषकादरम्यान एका वेगवान गोलंदाजाविरुद्ध हिट विकेट होण्यासाठी त्याला २० लाख बांगलादेशी टका (अंदाजे १६,४०० अमेरिकन डॉलर) देऊ केले होते.
आयसीसीच्या कागदपत्रांच्या आधारे, शोहेली अख्तरने १२ फेब्रुवारी २०२३ रोजी बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी फेसबुक मेसेंजरद्वारे बांगलादेशमधील एका खेळाडूशी संपर्क साधला. शोहेली अख्तरने एका अज्ञात क्रिकेटपटूला व्हाईस नोट्स पाठवले, जे मॅच फिक्सिंगशी संबंधित असल्याचे समजत आहे.
शोहेली अख्तरने सांगितले की, फोनवर सट्टा लावणाऱ्या तिच्या चुलत बहिणीने तिला खेळाडूशी बोलण्यास सांगितले आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाजाविरुद्ध हिट विकेट बाद होऊ शकते का? हे विचारण्यास सांगितले. बाद होणाऱ्या खेळाडूला २० लाख बांगलादेशी टका दिले जातील. हे संभाषण गुप्त ठेवण्यात येईल आणि मेसेज डिलीट केले जातील, असेही सांगण्यात आले.
क्रिकेटपटूने तात्काळ एसीयूशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. फोनमधील मेसेज डिलीट करणाऱ्या शोहेली अख्तरच्या सर्व व्हॉईस नोट्सही तिने दिल्या. शोहेली अख्तरने एसीयूचे स्क्रीनशॉट दाखवून निर्दोष असल्याचा दावा केला. परंतु, चौकशीदरम्यान हे स्क्रीनशॉर्ट बनावट अशल्याचे निष्पन्न झाले.
आंतरराष्ट्रीय कारकिर्द
शोहेली अख्तरने दोन एकदिवसीय आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. एकदिवसीय सामन्यात तिने ३.२६ च्या इकॉनॉमीने तीन विकेट्स घेतल्या आहेत. ३/१३ ही तिची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. तर, टी-२० क्रिकेटमध्ये तिने ८ विकेट्स घेतल्या आहेत.