kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

डोक्यापासून पायापर्यंत मोती, पाचू,हिरे; मेट गालामध्ये आईच्या दागिन्यांमध्ये ईशा अंबानीची रॉयल झलक

मेट गालामध्ये आलेल्या सर्वच सेलिब्रिटींच्या फॅशनबद्दल चर्चा होत आहे. मेट गालामध्ये शाहरूख खानपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत सर्वांनीच त्यांच्या लूक आणि फॅशने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते अंबानी कुटुंबातील लेकीनं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीची चर्चा मेट गालामध्ये जरा जास्तच रंगली होती. ईशा अंबानी तिच्या फॅशनेबल स्टाईलसाठी नेहमीच ओळखली जाते. अंबानी कुटुंबाची पार्टी असो किंवा एखादा खास कार्यक्रम असो, अंबानी कुटंबामधील महिलांच्या फॅशनची चर्चा ही होतेच होते. अशा परिस्थितीत, मेट गालामध्ये तर ईशाच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ईशा अंबानीचा पेहराव, लूक म्हणजे केसांपासून ते पायापर्यंत पायापर्यंत मोती, पाचू,हिऱ्यांनीच सजलेली दिसत होती.

मेट गालामध्ये ईशाने यावेळीही टेलर्ड फॉर यू ड्रेस कोड फॉलो केला होता . पण, इथे सर्वात जास्त लक्ष वेधल ते तिच्या कपड्यांपेक्षा, तिने घातलेल्या नवाबनगरच्या महाराजांकडून इंस्पायर्ड असलेल्या हिरेजडीत नेकलेसने. रिपोर्ट्सनुसार या नेकलेसची किंमत 839 कोटी रुपये आहे. मेटच्या निळ्या कार्पेटवर हिऱ्या-मोत्यांनी सजलेल्या ईशा अंबानीची स्टाईल एकाही कॅमेऱ्यातून सुटली नाही. ईशा अनामिका खन्नाच्या कस्टम आउटफिटमध्ये होती. स्टायलिस्ट अनायता श्रॉफ अडाजानिया यांनी सांगितलं की, हाताने विणलेले चेकर्ड फॅब्रिक रिलायन्स हँडलूम स्टोअर स्वदेश येथून आणले होते आणि डिझायनरला दिले होते. कार्यक्रमाच्या फक्त दोन दिवस आधी 3 मेच्या आधीच हा पोशाख तयार करण्यात आला होता.

मईशा सुंदर भरतकाम असलेला पांढरा कॉर्सेट परिधान केला होता. ज्यावर सोनेरी रंगाच्या सिक्विन तार्‍यांनी बोसारखी रचना बनवण्यात आली आहे आणि त्याच्या मध्यभागी एक रेड स्टोन लावून त्याची बॉर्डर पांढऱ्या मोत्यांनी हायलाइट करण्यात आली होती. शेवटी त्याला मोत्यांनी देखील सजवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत तिने घातलेले काळ्या रंगाचे ट्राउझर्स परिपूर्ण दिसत होते. ज्याला बाजूला ग्रीन स्टोन ठेवून हायलाइट केलं गेलं. ईशाचा फ्लोर टचिंग केपने लूक आणखी सुंदर बनवला होता . हाताने भरतकाम करण्यासाठी 20,000 तासांहून अधिक वेळ लागला. त्यावर सोनेरी रंगाचे चेकर्ड डिझाइन होते, कॉरसेटसारखे बो और पत्तियों वाला कटआउट डिझाइन छान दिसत होते. ज्यामध्ये रेड थ्रेड वर्क से कलर टच ब्लॅक अँड वाइट लुकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. तसेच ईशाने तिचा ओव्हरकोट स्टाईल जॅकेटही घातला होता. तर कधी ती फक्त स्टाईलसाठी खांद्यावर घेऊन लूक देताना दिसायची.

हिऱ्यांच्या अंगठ्यांमुळे खुलला ईशाचा मेट गाला लूक

तिने घातलेल्या अनेक हिऱ्यांच्या अंगठ्यांमुळे ईशाचा मेट गाला लूक छानच दिसत होता. दोन लेयरच्या हिऱ्याच्या नेकलेसमध्ये तीन हिरे जोडलेले होते. तर त्याखाली तीन वेगवेगळ्या आकाराचे हिरे देखील लावण्यात आले होते. तसेचि तिने पोनीटेलमध्ये वेणी बांधून तिने केसांमध्ये चिमणीच्या आकारचे हिरेजडीत ब्रोचही लावलं होतं. तसेच ब्रोचमुळे ईशाचा लूकही खूपच यशस्वी झाले होते.

आईचे दागिने

ईशाने ज्वेलरी इन्फ्लुएंसर ज्युलिया चाफे यांना सांगितले की बहुतेक दागिने तिची आई नीताचे आहेत. त्यात तिचा हार आणि तिच्या ट्राउझर्सवरील ब्रोचचा समावेश आहे. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे 1931 मध्ये नवाबनगरचे महाराजा दिग्विजयसिंहजी जडेजा आणि रणजितसिंहजी यांच्यासाठी कार्टियरने बनवलेले हार. ज्याची एक कॉपी ईशाने परिधान केलेली दिसते. ईशा अंबानीने डोक्यावर जी पांढरी टोपी घातली होती तीही शाही लूक देत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *