सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक, व्यावसायिक तथा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील कार्यकर्ते अरुण रंगनाथ दांडेकर (वय ७५) यांचे गुरुवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, बंधू असा मोठा परिवार आहे.
ब्राह्मण नागरी पतसंस्थेची त्यांनी स्थापना केली. तसेच चेंबर ऑॅफ कॉमर्समध्येही ते सक्रिय होते. सांगलीत रोटरी क्लबच्या उभारणीत आणि या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार होता. तसेच यंग मेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले.