kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अहो, आमदार पळवून नेलेले घटनाबाह्य ‘मुख्यमंत्री’ ; ऍड. अमोल मातेले यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पाण्याचा फवारा मारला होता. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ऍड. अमोल मातेले यांनी हल्लाबोल केला आहे. काय आहे त्यांची सोशल मीडिया पोस्ट जाणून घेऊया

काय आहे ऍड. अमोल मातेले यांची पोस्ट ?

डोक्यातली धूळ कधी झटकणार, बोगस मुख्यमंत्री ?बिल्डरांना अगोदर मुंबईचे लचके तोडायला द्यायचे नंतर स्वतः हातात पाण्याचे ‘फवारे’ घ्यायचे !मुंबई बिल्डरांकडून ‘गिळंकृत’ केली जातेय आणि तुम्ही पाण्याचे फवारे मारताय… वाढत्या प्रदूषणाबाबत मुंबईकर सजग झालाय. तुमचे काही दिवसच उरलेत, घ्या फवारण्या मारून!!