प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवेदनावर अमोल मिटकरी यांनी टीका केली, तर ॲड. अमोल मातेले यांनी त्यावर प्रत्युत्तर देताना त्यांच्या शैलीत उत्तर दिले.
“जशी झाडाची पानं गळतात, तशी काही मंडळी पक्ष सोडून जातीलही, पण झाडाची मुळे मजबूत असली की नवीन पालवी फुटतेच!” असे मातेले म्हणाले.
तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले, “जो पेरतो तोच उगवतो, पक्षाच्या शरद पवार विचारधारेतून काम करणाऱ्यांना सन्मान मिळणार आहे. ज्या पद्धतीने जयंत पाटील यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे, त्यावर टीका करणारे लोक ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीला जागतात.”
“सिंहगर्जना करणाऱ्यांची वेळ आली की ‘सिंह बनायचं धाडस दाखवा, मग राजाची आस धरा’, बाकी फक्त शब्दांचे फुलोरे फेकून काहीही साध्य होणार नाही,” असे ॲड. अमोल मातेले त्यांनी ठणकावून सांगितले.