12 जुलै रोजी मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. अनंत – राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा संपन्न झाला. संगीत सोहळ्यात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा फडणवीस यांच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधले. सोशल मीडियावर अमृता फडणवीस आणि दिविजा यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस यांनी हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. तर दिविजा हिने काळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. दोघींनी जवळपास सारखेच ड्रेस घातले होते व लूकही सारखाच केला होता. दोघीही पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील दोघींचा लूक प्रचंड आवडला आहे.
अनंत- राधिकाच्या पहिल्या प्री- वेडिंग सोहळ्यास देखील अमृता फडणवीस आणि दिविजा यांनी हजेरी लावली होती. जामनगर येथील देखील दोघींचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात दोघींनी हजेरी लावली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न 12 जुलै रोजी मोठ्या थाटात होणार आहे. दुपारी 3 वाजता शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. एवढंच नाही तर, अंबाना कुटुंबियांनी रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं आहे. 14 जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे. ज्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात येणार आहे.