अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविन्द केजरिवाल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल झिंदाबाद, ‘दिल्ली जीतेंगे, केजरीवाल जीतेंगे’, ‘जेल का जवाब, वोट से’ अशा घोषणा दिल्या. हा घोषणाबाजी करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू असलेला सामना पाहण्यासाठी आलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे टी-शर्ट घातले होते. या टी शर्टवर ‘जेल का जवाब वोट से’ असा मजकूर लिहिला होता. या सामन्या दरम्यान त्यांनी अरविन्द केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या. ‘दिल्ली जीतेंगे, केजरीवाल जीतेंगे’ या घोषणा देतानाचा त्यांचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.