kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! चांद्रयान 3 आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून पृथ्वीच्या कक्षेत परतले

चांद्रयान 3 आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून पृथ्वीच्या कक्षेत परतले असल्याचे समोर येत आहे. भारताच्या केवळ नवीन मोहिमा सुरू करण्याच्याच नव्हे तर त्यांना परत बोलावण्याच्या क्षमतेमध्ये ही एक मोठी झेप मानली जात आहे. तसेच चंद्रावरील विक्रम लँडर एका पृष्ठभागावरून दुसऱ्या पृष्ठभागावर नेण्याच्या प्रयोगानंतर इस्रोचे हे आणखी एक यश आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने एक्स या सोशल मीडियावर ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

या चांद्रयान 3 मध्ये लावण्यात आलेले प्रॉपल्शन मॉड्यूल यशस्वी वळण घेते आहे. त्यामुळे प्रॉपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्याचा आणखीण एक प्रयोग यशस्वी झाला आहे.चांद्रयान-3 चे प्रॉपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणले गेले. हे अंतराळयान 14 जुलै 2023 रोजी SDSC, SHAR वरून LVM3-M4 वाहनावर सोडण्यात आले. 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरला होता.

इस्रोने जारी केलेल्या निवेदनात काय म्हटले आहे ?

एजन्सीचे मुख्य लक्ष्य लँडर मॉड्यूलला प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करणे आणि चंद्राच्या अंतिम कक्षेत ठेवणे हे होते. विभक्त झाल्यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूलचे स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप) पेलोड सक्रिय केले गेले. या योजनेनुसार, आधी हा पेलोड प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये तीन महिन्यांसाठी सक्रिय ठेवण्याची योजना होती. सध्या प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीभोवती फिरत आहे. 22 नोव्हेंबर रोजी त्याने 1.54 लाख किमी अंतरावर पहिले पेरीजी पार केले. या कक्षेत राहण्याचा कालावधी १३ दिवसांचा आहे असे इस्रोने सांगितले.

पृथ्वीवर परतण्याचा काय फायदा होणार?

प्रॉपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून परत आणण्याच्या प्रयोगाचा मुख्य फायदा आगामी मोहिमांचे नियोजन करताना होईल, असे इस्रोने म्हटले आहे. विशेषत: मोहिमेला चंद्रावरून पृथ्वीवर परत आणणे. सध्या, मॉड्यूलसाठी सॉफ्टवेअर तयार केले जात आहे, जे प्राथमिक टप्प्यात आहे,असे देखील इस्त्रोने सांगितले.