kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुख्य शूटर शिवकुमार गौतमला अटक

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. सिद्दीकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत तीन आरोपींचा समावेश होता. ज्या दिवशी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, त्याच दिवशी पोलिसांनी यातील दोन शूटरला अटक केली होती, मात्र ज्याने सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता, तो मुख्य शूटर शिवकुमार गौतम हा गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आला पोलिसांना यश आलं आहे. आरोपीकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार गौतमला अटक करण्यात आली आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या बहाराईच येथून अटक करण्यात आली आहे. शिवकुमार गौतम सोबत आणखी 2 इतर आरोपींना देखील पोलिसांनी अटक केलं आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश एस टी एफ ने ही संयुक्त कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश एस टी एफच्या पथकासोबत मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे सहा अधिकारी आणि इतर पंधरा जण या संयुक्त कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना आता मुंबईला आणलं जात आहे. पोलीस तपासात आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीक यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ज्या दिवशी गोळीबार करण्यात आला तो दसऱ्याचा दिवस होता. सिद्दीकी हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी कार्यालयात आले होते. याचदरम्यान तिघांनी बाबा सिद्दकी यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच कनेक्शन देखील समोर आलं आहे.