kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! जनता दरबार सुरु असतानाच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. जनता दरबार सुरु असतानाच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. शनिवारी केंद्रीय मंत्री बेगुसराय बलिया ब्लॉकमधील जनता दरबारात पोहोचले होते. या दरम्यान येथून जात असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने केंद्रीय मंत्री थोडक्यात बचावले. उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ला करणारा आरोपी मुस्लीम असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना गिरिराज सिंह म्हणाले की, ते अशा हल्ल्यांना घाबरत नाहीत.

जनता दरबारात केंद्रीय मंत्री जनतेला भेटून त्यांच्या समस्या ऐकत होते. तेवढ्यात सैफी नावाचा तरुण पुढे आला आणि त्याने आधी माईक ताब्यात घेतला आणि बेताल वक्तव्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्याचा निषेध केला असता त्याने गिरीराज सिंह यांना धक्काबुक्की केली. मात्र घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले की, दाढी वाढवल्याने कोणी मुल्ला होत नाही. मुस्लिम तरुण ज्याप्रकारे त्यांना धमकवत आहेत, त्याला आपण घाबरत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्यासारख्या लोकांच्या पाठिंब्यामुळे स्वतःला कट्टरतावादी मुस्लीम म्हणवणाऱ्या लोकांचे मनोबल वाढले आहे. एका खासदारावरही हल्ला करायला ते मागे हटत नाहीत.

तसेच, गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वक्फ बोर्डावर प्रश्न उपस्थित केले असून वक्फ बोर्ड फतुहामध्येच नव्हे तर बेगुसराय येथील हिंदूंच्या जमिनीवरही नोटीस पाठवत आहे आणि त्यावर आपला दावा करत आहे. वक्त मंडळाच्या कामाचे रूपांतर सध्या भूमी संवर्धन मोहिमेत झाले आहे.

ते म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्ही फाळणी केलीत तर कापले जातील’ असे जे म्हटले आहे ते अगदी खरे आहे. हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी संघटित व्हावे लागेल. अन्यथा अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यासारखे लोक भारताला इस्लामिक देश बनवतील.