kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

BLA चा नवीन दावा ; 214 सैनिकांचा खात्मा

11 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण झाले होते. BLA ने त्यांचे राजकीय कैदी, त्यांचे नेते, काही लोकांना सोडण्यासाठी ही ट्रेन हायजॅक केली होती. या घटनेला चार दिवस उलटले. पण पाकिस्तान नेहमीसारखे खोटे बोलत आहे. अफगाणिस्तानसह भारतावर खापर फोडत अनेक तथ्य आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता मोठी बातमी समोर येत आहे. BLA ने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी ओलिस ठेवलेल्या 214 जवानांचा खात्मा केला आहे. पाकिस्तान सरकारचे नाक कापल्याने ते या गोष्टी लपवत असल्याचा दावा सुद्धा बलूच आर्मीने केला आहे.

बलूच लोकांवरील विशेषतः महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराची सीमा पाकिस्तानी लष्कराने गाठली आहे. त्याचाच बदला BLA बलूच लिबरेशन आर्मीने घेतला आहे. बंडखोरांनी प्रवाशांना लक्ष्य केल्याचा कांगावा करणारा पाकिस्तान बीएलएनेच उघडा पाडला आहे. एकीकडे ओलिस ठेवलेल्या 214 जवानांचा खात्मा केल्याचा दावा BLA ने केला आहे तर दुसरीकडे पाकिस्तानच्या लष्कराने सारवासारव सुरू केली आहे. DG ISPR ने पाकिस्तानमधील ओलिस सुटकेचा एक व्हिडिओ शेअर करत सर्व ओलिसांची सुटका केल्याचे जाहीर केले. लष्कराच्या प्रवक्त्यानुसार, एकूण 354 ओलिसांची सुटका करण्यात आली. तर 37 प्रवाशी जखमी झाले असून 26 ओलिसांचा मृत्यू झाला आहे ज्यात 18 सैनिक होते. तसेच, बीएलएचे अनेक बंडखोर ठार केले आहेत. तर, बीएलएने या सर्व ऑपरेशनचा खरा व्हिडिओ समोर आणण्याचे आव्हान पाकिस्तान सरकारला दिले आहे.