Breaking News

चीनमध्ये पुन्हा कोरोना ??

चीनमधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ तेजीने व्हायरल होत आहेत. चीनमधील कोरोनाने पाच वर्षांपूर्वी संपूर्ण जगात थैमान घातले होते. चीनवर त्यावेळी जगभरातून टीका झाली होती. जगभरात लॉकडाऊन लागले होते. आता इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (hMPV) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. ही एक महामारी असल्याची चर्चा होत आहे. अर्थात जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि चीन सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सध्या चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब दिसणाऱ्या रांगा , चीनमध्ये प्रत्येक चेहऱ्यावर परत आलेले मास्क पुन्हा जगाला नवीन महामारी देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे, जो आरएनए विषाणू आहे.जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी 2 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो.

समाज माध्यमांवर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल होत आहे. चीनमधील अनेक दवाखाने सध्या अबालवृद्धांमुळे गजबजले आहेत. सध्या ही गर्दी अधिक दिसत असल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील बदलामुळे आणि थंडीच्या लाटेने चीनमध्ये आजार बळावले आहे. कोरोनानंतर अनेक लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. अशावेळी वातावरण बदलानंतर सर्दी-पडशाचे प्रमाण वाढले आहे. इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (hMPV) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात यापूर्वी हे आजार या देशात बळावले होते. हा नवीन आजार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस हा RNA व्हायरस आहे. 2001 मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा विषाणू प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते.HMPV चे मुख्य सॉफ्ट टार्गेट मुले आणि वृद्ध आहेत. हे तेच गट आहेत ज्यांना कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक फटका बसला होता.

या आजाराची लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे आणि घशात घरघर येणे यांचा समावेश आहे. एचएमपीव्ही व्यतिरिक्त, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड -19 ची प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत. त्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या आजरामुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.खोकल्यामुळे आणि शिंकण्याने व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो. जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर न्यूमोनिया देखील होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *