भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली. कमान हाती घेतल्यानंतर भारताने आतापर्यंत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळल्या आहेत आणि सध्या त्याची बांगलादेशसोबत कसोटी मालिका सुरू आहे. दरम्यान, टीम इंडियाचा डॅशिंग फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने गंभीर आणि द्रविडच्या कोचिंगमधील फरक स्पष्ट केला आहे.

दोघांच्या वागण्यात काय फरक आहे हे त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले. २०२१ च्या टी-20 विश्वचषकानंतर द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला. २०२४ च्या टी-20 विश्वचषकापर्यंत तो या पदावर होता. आता २०२७ च्या विश्वचषकापर्यंत गंभीरकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी आहे.

गंभीर आणि द्रविडच्या कोचिंग शैलीतील फरक सांगताना अश्विन म्हणाला, की ‘मला वाटतं तो (गंभीर) खूप रिलॅक्स आहे. मला त्याला ‘रिलॅक्स रँचो’ म्हणायचे आहे. कुठलाही दबाव नाही. सकाळच्या वेळी संघाची बैठक होणार आहे. त्याबाबतही तो खूप रिलॅक्स असतो. तो म्हणेल, ‘तू येणार आहेस का, प्लीज ये’. हे असंच आहे.’ अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हे सांगितले.

“राहुल भाईंबरोबर आम्ही येताच त्यांना गोष्टी व्यवस्थित हव्या होत्या. अगदी पाण्याची बाटलीसुद्धा ठराविक वेळी विशिष्ट ठिकाणी ठेवली पाहिजे. तो खूप रेजिमेंटेड आहे. त्याला गोष्टी व्यवस्थित हव्या होत्या. तोही शांत आहेत. मला वाटतं तो लोकांच्या मनात घर करतो”.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनने चांगली कामगिरी केली होती. चेन्नईत खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने शतकी खेळीसह ६ विकेट्सही घेतल्या होत्या. या खेळाबनंतर त्याने प्रेक्षकांचे आभार मानले. अश्विनने चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीचेही कौतुक केले आणि सांगितले की तो भारतात खेळलेला सर्वोत्तम कसोटी विकेट आहे.

तमिळनाडूच्या रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये अशाच खेळपट्ट्या तयार करण्याचे आवाहन त्याने क्युरेटर्सना केले. अश्विन म्हणाला, ‘प्रेक्षक सामना पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. इथली खेळेपट्टी नक्कीच खूप चांगली होती. मला आशा आहे की तामिळनाडू रणजी ट्रॉफीमध्येही अशाच खेळपट्ट्यांवर खेळायला मिळेल.”