kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभय योजनेला १ वर्षांची मुदतवाढ देणेबाबत ॲड.अमोल मातेले यांनी केली मागणी

बृहन्मुंबईतील रखडलेल्या योजनांतील परिशिष्ट-२ निर्गमित झाल्यानंतर खरेदी-विक्री करणाऱ्या झोपडीचे हस्तांतरणकरीता एकवेळची अभय योजनेला १ वर्षांची मुदतवाढ देणेबाबत ॲड.अमोल मातेले यांनी मागणी केली आहे.

मुंबई बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयाने मुंबईतील रखडलेल्या योजनेतील अंतिम परिशिष्ट-२ निर्गमित झाल्यानंतर खरेदी- विक्रीद्वारे झोपडीचे हस्तांतरणकरिता एक वेळची अभय योजना ३ महिन्याच्या कालावधी करीता जाहीर करण्यात आली आहे. तथापि, सदरील योजना, राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाल्याने, त्या संबंधित सर्व शासनाचे अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त झाल्याने सदरील योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करता आलेली नसल्याने, झोपडीधारकांना त्याचा लाभ घेता आलेला नाही.

सबब, संदर्भाधीन शासन निर्णयास मुदत वाढ द्यावी, अशी मागणी प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व मुंबईचे युवकचे अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केली.