kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

१४ डिसेंबर रोजी पार पडणार मृणालताई नाट्यकरंडक २०२३ (वर्ष ६ वे)ची खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी

“सोहम थिएटर्स” आयोजित मृणालताई नाट्यकरंडक २०२३ (वर्ष ६ वे) खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवार १४ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. १० ते ७ या वेळेत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली (प.) येथे ही स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेत एकूण पट- १ (वीथी वझे रंगकर्मी), पडदा (नाट्य परीवार, ठाणे), लोकल पार्लर (गुरू नानक खालसा स्वायत्त महाविद्यालय), अ डील (नाट्यसेवा, नाशिक), जिन्याखालची खोली (कलाश थिएटर), उणिवांची गोष्ट (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे) यांचा समावेश आहे. याचे ऑनलाईन तिकीट बुकिंग बुधवार १३ डिसेंबर सध्या. ७.०० वाजेपर्यंत असणार आहे. यासाठी खाली दिलेल्या संकेत स्थळाला भेट द्यावी ..

https://www.tickethub.co.in/book-plays.php?id=mrunaltai-natya-karandak-2023&tktqty=1&playtime=10:00am

अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२१३५५२६४ ९८६७४४४४१८