kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेताना भारतानेऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या कारवाईमध्ये दहशतवादी संघटनांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्याची माहिती आता टप्प्याटप्प्याने समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सैन्य दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याचा निकटवर्तीय सहकारी मुख्तियार अहमद ठार झाला आहे. मुख्तियार हा हाफिज सईद याचा मुलगा तल्हासोबत राहत असे. मुख्तियारच्या मृतदेहाचा फोटो समोर आला आहे. तर सईदचा मुलगा तल्हा हा बेपत्ता आहे.

ज्यावेळी भारतीय सैन्यदलांनी एअरस्ट्राईक केली तेव्हा हाफिज सईदचा मुलगा तल्हा हा मुख्तियार अहमदसोबत होता की, नाही याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. हाफिज सईदने मुख्तियार याला तल्हा सोबत २४ तास राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, तल्हा कुठे आहे याबाबत सध्यातरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तीन दिवसांपूर्वीपर्यंत तल्हा सईद पाकिस्तानमधील विविध भागात फिरून भारताविरोधात गरळ ओकत होता. तसेच भारताला धडा शिकवण्याची धमकी देत होता. मात्र काल भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तो बेपत्ता झाला आहे. मात्र पाकिस्तानी सैन्याने त्याला आपल्या कुठल्या तरी कमांड सेंटरमध्ये लपवले असण्याची शक्यता आहे.

हाफिज सईदचा मुलग्ला तल्हा सईद याने हाफिज सईदला अटक करण्यात आल्यानंतर मुझफ्फराबाद येथील टेरर कॅम्पची सूत्रे हातात घेतली होती. तो दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यासह निधी उभारण्यात आणि कारवायांची आखणी करण्यात पटाईत आहे. पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी हे या अड्ड्यावर प्रशिक्षण घेऊन आलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *