kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

रेड अलर्टनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

नेहमी हवाहवासा वाटणार पाऊस पुणेकरांना घाबरवून सोडत आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये दोन वेळा पुणे शहरातील अनेक भाग पाण्यात गेले. त्यानंतर रविवारी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर पुणे शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून पुणे शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून शहराला सतर्कतेचा इशारा दिला आहे. द्वारका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसले आहे. पहिल्या मजल्यावरचे लोक बाहेर जायला सुरूवात झाली आहे. सिंहगड रस्त्यावरील एकतानगरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. द्वारका सोसायटी पूर्ण रिकामी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचे दिले आदेश दिले आहेत.