स्वारगेट बस स्थानकात आज बुधवार (दि.२६) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका नराधमाने २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. दत्तात्रय गाडे असे या अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. या घटनेने शहरातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला आहे
दरम्यान आता या घटनेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्वारगेट डेपोमधील २३ सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.