Breaking News

जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नोंदवले गेलेले तीन राजकीय विक्रम काय आहेत

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. यामुळे भाजपात प्रचंड उत्साह आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर तीन राजकीय रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत.

मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद पाहण्यास मिळाला. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल मराठवाड्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी फडणवीसांवर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर कुठले तीन रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत? हे आपण जाणून घेऊ.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरचा पहिला रेकॉर्ड आहे तो तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये ७२ तास म्हणजेच तीन दिवसांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या भाषणातही हा उल्लेख केला. की त्यांना सलग तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी २०१९ मध्ये तीन दिवसच मुख्यमंत्री राहू शकलो असंही देवेंद्र फडणवीस मिळाले. यानंतर आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस करत आहेत. शरद पवारांच्या नंतर तीनदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी १०० हून अधिक आमदार निवडून आणले. एखाद्या पक्षाचे आमदार सलग तीनवेळा निवडून आणणं ही किमया फक्त देवेंद्र फडणवीस यांनी साधली आहे. आपण जाणून घेऊ कुठल्या वर्षी भाजपाचे किती आमदार होते.