जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक असलेली Apple या वर्षाच्या अखेरीस भारतात आणखी रिटेल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. Apple चे CEO Tim Cook यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे की येत्या काळात अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश iPhones भारतातच बनवले जातील, असे म्हटले आहे.
Tim Cook म्हणाले की, Apple हळूहळू आपले उत्पादन युनिट चीनमधून हलवत आहे आणि भारताला नवीन मॅन्युफॅक्चरिंग हब बनवत आहे. केवळ iPhones साठीच नव्हे, तर इतर उत्पादनांसाठीही Apple आपले चीनवरील अवलंबित्व कमी करत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ हे आहे.
Apple चे CEO Tim Cook म्हणाले की, अमेरिकेबाहेर विकली जाणारी Apple ची बहुतेक उत्पादने अजूनही चीनमध्येच तयार केली जातील. सध्या अमेरिका चीनमधून येणाऱ्या इलेक्ट्रकॉनिक उत्पादनांवर 145 टक्क्यांपर्यंत जड टॅरिफ (आयात शुल्क) लावत असून अमेरिका-चीन वाटाघाटी सध्या रखडल्या आहेत. आतापर्यंत बहुतांश iPhones चीनमध्ये बनवले जात होते, पण अमेरिकेने चीनवर लादलेले भरमसाठ टॅरिफ आणि चीनकडून प्रत्युत्तरात्मक टॅरिफ यामुळे Apple ला फटका बसू लागला. यामुळे कंपनी हळूहळू भारतात उत्पादन वाढवत आहे. सध्याच्या टॅरिफ अटी बदलल्या नाहीत तर Apple ला या तिमाहीत सुमारे 90 कोटी रुपयांचे (सुमारे 7,500 कोटी रुपये) नुकसान होऊ शकते, असेही Tim Cook यांनी म्हटले आहे.
Leave a Reply