मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. नव्या वर्षासाठी मुंबईसह उपनगरातील नागरिक पुणे, लोणावळ्यासह कोकणात जायला निघल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि पुणेकर नागरीक घराबाहेर पडले आहेत. यामुळे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनाच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत. नागरीक या कोंडीत अडकल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात मुंबईकर बाहेर पडले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा येथे पर्यटक दाखल होत आहेत. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
गेल्या आठवड्यात देखील ख्रिसमस आणि विकेंडमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल १० किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल ३६ तास ही कोंडी कायम होती. यामुळे शेकडो वाहने मार्गावर बंद पडल्याने कोंडीत आणखी भर पडली. त्यात आता नवीन वर्ष आणि विकेंडमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला पडल्याने एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.