‘‘निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यात सहभागी करून आध्यात्मिक जागृती आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य आहे.’’ असे प्रेरणादायक प्रतिपादन निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षाच्या शुभ प्रसंगी दिल्लीतील ग्राउंड नम्बर 8, निरंकारी चौक, बुराड़ी रोड येथे आयोजित विशेष सत्संग समारोहात केले. या सत्संगात दिल्ली, एन.सी.आर. सह विभिन्न प्रदेशातून हजारो भक्तगण सहभागी झाले होते. नव वर्षाच्या प्रथम दिनी सतगुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात त्यांच्या दिव्य दर्शनाचा आणि अमृतवाणीचा लाभ घेत आध्यात्मिक ऊर्जेचा सुखद आनंद प्राप्त केला.
सतगुरु माताजींनी आपल्या सम्बोधनामध्ये सांगितले की नववर्ष हे केवळ 2024 चे 2025 असे आकड्यातील परिवर्तन आहे. वास्तविक पाहता मानवी बुद्धीने तयार केलेली धारणा आहे. निरंकार प्रभूने काळ आणि सृष्टिची रचना केली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गृहांवर वेळेचे गणित वेगवेगळे असते. म्हणूनच प्रत्येक क्षण सार्थकी लावणे हाच नववर्षाचा अर्थ आहे.
खराखुरा शाश्वत आनंद केवळ निरंकार ईश्वरात सामावला आहे. हे नववर्ष आपण असे घडवायचे आहे ज्यायोगे प्रत्येक मानवा पर्यंत आपण हे सत्य पोहचवू शकू. जीवनात सेवा, सुमिरण आणि सत्संगचा वास्तविक अर्थ तेव्हाच प्रकट होईल जेव्हा आपण त्याचा हृदयापासून स्वीकार करु. केवळ मित्रता अथवा सामाजिक दबावाखाली आपण आपली आध्यात्मिकता बदलू नये. शुद्ध बभावना आणि जागरूक राहूनच आपण आपले जीवन निरंकार प्रभूशी जोडू शकतो.
आपल्या कर्त्यव्यांचे पालन करत प्रत्येक कार्यात निराकाराला अंतर्भूत करणे गरजेचे आहे. जीवनात आध्यात्मिकता आणि समाधान देणारा हाच मार्ग आहे. या नववर्षात आपल्या पूर्वानुभवातून धडा घेऊन आपल्या अंतरातील उणिवा सुधारून चांगुलपणाचा अंगीकार केला पाहिजे. मानवी गुणांनी युक्त जीवन हेच खरे जीवन होय.
सतगुरु माताजींच्या प्रवचना अगोदर आदरणीय निरंकारी राजपिताजी यांनीही समस्त भक्तगणांना सम्बोधित करताना सांगितले, की वर्तमान समयाला मानव समाजातील परमात्म्याची जिज्ञासा हळूहळू समाप्त होत चालली आहे. लोक परमातम्याच्या अस्तित्वावरच शंका व्यक्त करात आहेत. सत्याचा मार्ग शोधण्या ऐवजी तो नाकारू लागले आहेत. ही स्थिति उद्भवण्याचे कारण म्हणजे कित्येक लोक परमात्मा प्राप्तीचा दावा तर करतात पण त्यासाठी योग्य प्रयत्न करत नाहीत. सतगुरू कृपेने आम्हाला जे सत्य प्राप्त झाले आहे ते केवळ सांगण्या ऐकण्या पुरते मर्यादित राहू नये. ते आमच्या जीवनातून जाणवले पाहिजे. त्याचा सुगंध असा दरवळवत राहून समाजासाठी वरदान बनावा. आमचे जीवन परमात्म्याच्या प्रति प्रेरित करणारे व्हावे केवळ दिखावा नको.
सेवा, सुमिरण आणि सत्संग यांच्याअभावी भक्ती सदैव अपुरी आहे. परमात्म्याचा ज्यामध्येवास आहे तेच खरे जीवन होय. आपण प्रेम, समर्पण आणि जबाबदारीने मानव परिवाराला सोबत घेऊन जायचे आहे. सत्संगाच्या या अमूल्य पैलुला सजवून आपल्या जीवनाला असे साधन बनवावे ज्ययोगे आपण प्रभूच्या निकट जाऊ आणि इतरेजणांसाठी प्रेरणा स्रोत बनू.
या नववर्षाच्या प्रारंभी सतगुरु माताजी यांनी सकळजनाना सुख, समृद्धि आणि आनंदमय जीवनासाठी शुभकामना व्यक्त केल्या.