kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

संतापजनक ! जादूटोणाच्या संशयावरून महिलेची गावात नग्न धींड

एक संतापजनक घटना समोर येत आहे. जादू टोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात नग्न धिंड काढण्यात आली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडे गावात महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. यावेळी संपूर्ण गाव केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचेही पाहायला मिळालं.

रेहट्याखेडा येथील पीडित वृद्ध महिलेने मुलांसह 6 जानेवारी रोजी चिखलधरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ महाराणीचा गुन्हा दाखल केला. या पीडित महिलेचे मुलं राजकुमार शेलुकर आणि शामू शेलुकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली परिस्थिती सांगितली. या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर ती सोनोरी येथे आपल्या मुलीकडे राहायला गेली होती. यांच्या चार एकर शेतात गावातील पोलीस पाटलांनी थेट अंगणवाडी देखील बांधाचा आरोप या शेलूकर कुटुंबीयांनी केलेला आहे. वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहितेनुसार काही मारहानीचे गुन्हे दाखल केले.

मात्र आरोपीवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जादूटोणा संदर्भात गुन्हे लावले जातील असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले.