भारत आणि पाकिस्तानात पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानवर भारताने काल ड्रोन हल्ला केला. त्यासंदर्भात पाकिस्तानी लष्कराने वारंवार खोटे बोलत आपले स्टेटमेंट बदलले याचा पुरावा ट्वीटरवरच मिळाला आला आहे. पाकिस्तानी आर्मीने आधी भारतीयांचे ड्रोन आपल्या हद्दीत ११०० किमी आतमध्ये घुसल्याने मान्य केले. तर या ड्रोनना शोधून काढण्यात चायनीज रडार संपूर्णपणे अपशयी ठरल्याने पाकिस्तानने मान्य केले आहे.
आधी भारतीय ड्रोन आपल्या हद्दीत आलेच नाही असे सांगणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने अखेर भारतीयांचे ड्रोन आपल्या हद्दीत ११०० किमी आतमध्ये घुसल्याने मान्य केले.तसेच हे ट्रोन शोधण्यात चायनीज रडार फेल ठरल्याची कबुली पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नंतर ८ मे रोजी पाकचे लेफ्टनंट अहमत शरीफ यांनी सांगितले की आम्ही भारताने लाँच केलेली ड्रोन पाडून ठाकली आहे. ही ड्रोन्स तब्बत ३५ हजारफूट उंचीवर उडत असल्याचे पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी म्हटले आहे.
त्यानंतर डिफेन्स मिनीस्टर ख्वाजा असिफ यांनी आम्ही भारतीय ड्रोन्सना पाडण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्यामुळे आमची लोकशन्स त्यांना कळाली असती असेही त्यांनी म्हटले आहे. ड्रोनचा आधारे इराण आणि काही ठिकाणी अमेरिकेने यापूर्वी हल्ले आहेत. हे ड्रोन त्यामुळे अतिशय प्रगत मानेल जात असून नव्या प्रकराच्या युद्धात त्यांच्या वापर केला जात आहे. तुर्की देशाने पाकिस्तानला दिलेल्या सोंगर ड्रोनद्वारे पाकिस्तान देशाने भारताच्या लष्करी तळाची माहीती चोरण्याचा प्रयत्न करत आहे.