जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. आता या हल्ल्याबाबत पाकिस्तानातील एका नागरिकाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका नागरिकाने नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेवर सवाल केले आहेत. मौलाना मसूद अजहरच्या मदरशांवर हल्ला झाल्याची खात्रीलायक माहिती पाकिस्तानातून देण्यात आली आहे.
पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया काय?
भारताने बहावलपूरमध्ये हल्ला केला आहे. मौलाना मसूद अजहरच्या मदरशांवर चार मिसाईल डागण्यात आले आहेत. आम्ही मदरशाबाहेर पाकिस्तानी सैन्यासोबत उभे आहोत. माझा सवाल आहे की, जेव्हा पाकिस्तानात हल्ला होत होता, तेव्हा आमच्या गुप्तचर यंत्रणा कुठे झोपल्या होत्या? केवळ बहावलपूरच नव्हे, तर मुझ्झफराबादमध्येही हल्ला झाला आहे. मात्र, सर्वात आधी बहावलपूरमध्ये हल्ला झाला. मिसाईलने हल्ला करण्यात आला आहे. हे मिसाईल कोणत्या बाजूने आले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण मौलाना मसूद अजहरच्या मदरशांवर हल्ला झाला हे निश्चित आहे, असे पाकिस्तानातील नागरिकाने म्हटले आहे.
पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक
भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केले आहे. या हल्ल्यात दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव या कारवाईला का देण्यात आले, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानकडून या हल्ल्याला काय प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून निवदेन जारी करण्यात आले आहे. पाक लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात ८ लोकांचा मृत्यू झाला असून ३३ लोक जखमी झाले आहेत. पाकिस्ताा ६ ठिकाणी २४ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे.
Leave a Reply