मुंबई विद्यापीठाशी संलग्न शिक्षण संस्थांच्या निष्काळजीपणामुळे चाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी प्रलंबित राहणे हे केवळ व्यवस्थापनातील अकार्यक्षमता आणि दुर्लक्षाचे उदाहरण आहे. या प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य धोक्यात आले आहे. सन 2020 ते 21 या शैक्षणिक वर्षापासून ते 2023 ते 24 पर्यंत गेल्या चार वर्षाची कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा झालेले नाही. अभियांत्रिकी व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम देणाऱ्या संस्था मधील विद्यार्थी संख्या सर्वाधिक आहे. इतक्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रे विद्यापीठाला प्राप्त झालेली नाहीत वाणिज्य शाखेची परिस्थिती सारखीच आहे. विद्यार्थ्यांनी योग्य कागदपत्रे आणि शुल्क भरूनही वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण न होणे हे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींना अधोरेखित करते. वेळेत नोंदणी न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, परीक्षा अर्ज, प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहण्याची वेळ येत आहे. यामुळे त्यांच्या शैक्षणिक जीवनावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी सांगितले.
विद्यापीठ आणि संस्थांची जबाबदारी:
१. विद्यापीठ व संस्थांनी त्वरित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
२.दोषी व्यक्ती व विभागांवर कठोर कारवाई करावी.
३. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी सुधारित तंत्रज्ञान आणि प्रक्रियेची अंमलबजावणी करावी.
विद्यार्थ्यांच्या कष्टांचा आणि विश्वासाचा आदर करणे ही शिक्षण संस्थांची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठी व्यवस्थापनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणारा परिणाम अटळ आहे. विद्यापीठाच्या ढिसाळपणामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास ढासळण्याची वेळ आली आहे, जी गंभीर चिंतेचा विषय आहे.
विद्यार्थ्यांसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी!
विद्यापीठाने आणि संस्थांनी या चुकांची जबाबदारी स्वीकारून, विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी अधिकाऱ्यांनी पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
विद्यार्थीहितासाठी निर्णय लांबवू नका. शिक्षण व्यवस्थेचा गाभा म्हणजेच विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करा. करा असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते युवक ची मुंबई अध्यक्ष एडवोकेट अमोल मातेले यांनी सांगितले.