आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याच तोंडी एकच नाव तेच ते म्हणजे सुनीता विल्यम्स ! ‘ सुनीता त्यांचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती.[२] सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना , अँना ही ३ वर्ष मोठी होती
सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाल्या.त्यांना १९८७ साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली. १९८८ मध्ये नासाने सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर म्हणून निवड केली. विल्यम्स यांना दोन अंतराळ मोहिमांचा अनुभव आहे. त्यांनी एक्सपिडिशन ३२ चे फ्लाइट इंजिनीअर आणि एक्सपिडिशन ३३ चे कमांडर म्हणून काम केले. विल्यम्स यांनी ९ डिसेंबर २००६ रोजी मोहीम १४/१५ दरम्यान एसतीएस-११६ क्रूसह उड्डाण केले होते. आणि ११ डिसेंबर २००६ रोजी त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या.
एक्सपिडिशन ३२/३३ मध्ये, विल्यम्स यांनी १४ जुलै २०१३ रोजी रशियन सोयुझ कमांडर युरी मालेन्चेन्को आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे फ्लाइट इंजिनियर अकिहिको होशिदे यांच्यासह कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोनवरून अंतराळात उड्डाण केले. त्या वेळी विल्यम्स यांनी प्रयोगशाळेत फिरताना चार महिने संशोधन आणि शोधकार्य केले. १२७ दिवस अंतराळात राहिल्यावर त्या १८ नोव्हेंबर २०१२ रोजी कझाकिस्तान येथे पोहोचल्या. त्यांच्या मोहिमेदरम्यान, विल्यम्स आणि होशिड यांनी तीन स्पेसवॉक केले आणि स्टेशनच्या रेडिएटरमधून अमोनिया गळतीची दुरुस्ती केली.
५० तास आणि ४० मिनिटांच्या स्पेसवॉकसह, विल्यम्सने पुन्हा एकदा महिला अंतराळवीराचा सर्वात लांब अंतराळात चालण्याचा जागतिक विक्रम केला. विल्यम्स या एकूण ३३२ दिवस अंतराळात राहिल्या आहेत. विल्यम्स यांचा जन्म युक्लिड, ओहायो येथे भारतीय-अमेरिकन न्यूरोएनाटोमिस्ट दीपक पांड्या आणि स्लोव्हेनियन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पांड्या यांच्या घरी झाला. त्यांनी यूएस नेव्हल अकादमीमधून भौतिकशास्त्राची पदवी आणि फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली.
२०२४ मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ०५ जून रोजी स्टारलाइनरमधून इंटरनॅशनल स्पेस सेंटरसाठी उड्डाण घेतलं होतं. तिथं ०८ दिवसांसाठी गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल नऊ महिने अडकून पडले होते. आता, ड्रॅगन’ या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भारतीय वेळेनुसार, १९ मार्च २०२५ ला सुनीता विल्यम्स परतणार आहेत. त्यानुसार, अंतराळात सुनीता विल्यम्स यांनी एकूण २८६ दिवस घालवलेले असतील. या दौऱ्यासह अंतराळातील एकाच प्रवासामध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये सर्वाधिक वेळ घालवणारी तिसरी महिला अंतराळवीर ठरणार आहे. सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत ०९ वेळा स्पेसवॉक केलं आहे. यामध्ये या तिसऱ्या स्पेस वॉकचा समावेश आहे. या काळात त्यांनी ६२ तास ०६ मिनिटे स्पेसवॉकमध्ये घालवले आहेत.