सर्वोच्च न्यायालयाने आज (११ डिसेंबर) कलम ३७० च्या मुद्द्यावर ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे

‘कलम ३७० हटवण्यासाठी राष्ट्रपतींच्या अधिकाराचा वापर करणे आम्ही चुकीचे मानत नाही’, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींचा आदेश वैध मानला आहे.

देशाच्या राज्यघटनेतील सर्व तरतुदी जम्मू-काश्मीरला लागू केल्या जाऊ शकतात. हे कलम ३७०(१)डी अंतर्गत करता येते, असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.