Breaking News

मुंबईच्या हवेचा प्रश्न हा जनतेच्या जिवनमरणाचा आहे. केवळ आकडेवारी मांडून जबाबदारी झटकणाऱ्या विभागांवर आता कारवाईची वेळ आली आहे – ॲड.अमोल मातेले

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपवर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 160 ते 170 दरम्यान मध्यम श्रेणीत दाखवला जातो. या गंभीर समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक चे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी मुंबईतील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई अधीक्षकांची मागील आठवड्यात भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले होते.

मात्र, या निवेदनाच्या उत्तरादाखल मंडळाने सांगितले की, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय कार्यालयांना केवळ पत्रे पाठवली आहेत. विकासक, रस्त्यांचे खोदकाम, कंत्राटदारांचे बेशिस्त काम, आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणारे घटक या सर्व प्रदूषण वाढीसाठी जबाबदार असल्याचे त्यांनी कबूल केले आहे.

“प्रदूषण नियंत्रण मंडळ हे केवळ शोभेच्या नावापुरते आहे!

प्रदूषण नियंत्रणाचे नाव घेऊन फक्त फाईली आणि पत्रे फिरवणारे हे मंडळ आता “प्रदूषण प्रोत्साहन मंडळ” किंवा “प्रदूषण सहकार्य मंडळ” असेच म्हणावे लागेल!” असे मत एडवोकेट अमोल मातेले यांनी व्यक्त केले आहे.

महानगरातील प्रत्येक खोदकाम व प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना राबवण्याचे आदेश द्यावेत.

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

“मुंबईच्या हवेचा प्रश्न हा जनतेच्या जिवनमरणाचा आहे. केवळ आकडेवारी मांडून जबाबदारी झटकणाऱ्या विभागांवर आता कारवाईची वेळ आली आहे,” असे सांगत ॲड. अमोल मातेले यांनी याबाबत लोकशाही माध्यमातून खळबळजनक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *