kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. देशात लोकसभा निवडणुका होत असताना दुसरीकडे इस्रायल-इराण युद्धाचे पडसाद भारतीय शेअर बाजावरही उमटले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीची आज सकाळची सुरुवात पडझडीने झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्स ७१,९०० च्या खाली तर निफ्टी २१,९०० च्या खाली आला. बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचेही चित्र दिसले. निफ्टीमध्ये कोणत्याही क्षेत्राचा इंडेक्स आज हिरवा नाही. तर बीएसईमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे बाजारातील भांडवल सकाळी बाजार खुलताच ३.७१ लाख कोटींनी कमी झाल्याचे दिसले.

सकाळी बाजार उघडल्या नंतर बीएसई सेन्सेक्समध्ये ६०८.५० अंकाची (०.८४ टक्के) घसरण दिसली. तर अर्ध्या तासानंतर म्हणजे १० वाजण्याच्या सुमारास यात थोडी सुधारणा होऊन घसरण ३५० अंकापर्यंत (०.४८ टक्के) आली. तर निफ्टीमध्ये सकाळी बाजार उघडल्यानंतर १८२ अकांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे निफ्टी निर्देशांक २२ हजारांच्या खाली आला. १० वाजण्याच्या सुमारस यात थोडी सुधारणा होऊन निफ्टी निर्देशांक २१,८७७ वर स्थिरावला.

१८ एप्रिल रोजी बाजार बंद होत असताना बीएसईमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे एकूण मूल्य ३,९२,८९,०४८.३१ कोटी एवढे होते. त्यात १९ एप्रिल रोजी ३.७१ लाख कोटींची घसरण होऊन हे मूल्य ३,८९,१७,४०८.५१ एवढे झाले.