सुरुवातीच्या काळामध्ये अशोक कुमार स्वतःच गात होते .अछ्युत कन्या या सिनेमांमध्ये त्यांनी गायलेले मनका पंछी बोल रहा है! तसेच झुला या सिनेमा मधील गाणे ‘चली रे मेरी नांव चलीरे! चल चल रे नौजवान! कहना मेरा मान !’ ही गाणीअशोककुमारने गायिली आहे ! अगदी अलीकडे गाणे आशीर्वाद या सिनेमा मधील रेल गाडी रेल गाडी तलेगाव मलेगाव तलेगाव मलेगाव रेल गाडीचं झुक,झुकत झुक आगमन गाडीचे आवाजीचित्र अशोककुमारने ऊभे केले आहे. या वयातही आगगाडीचे चित्र डोळ्यासमोर ऊभे केलेले आहे .

असं सांगतात की चेंबूरला अशोक कुमारच्या बंगल्यातील खिडकीची बाजू कडून नलिनी जयवंतचे दर्शन घडत असे. अशोक कुमारचे नलिनी जयवंत वर प्रेम होते. दोघांचे बरेचसे सिनेमे देखील त्यावेळेला प्रदर्शित झालेले होते .अनुप कुमार याने जंगली या सिनेमांमध्ये शशिकला बरोबर स्वतःच्या आवाजामध्ये गायलेले गीत खूपच लोकप्रिय झालेले होते .ती शेवटी अशोक कुमार आणि अनुप कुमार या दोघांनी दूरदर्शनवर मुसलमान भावाची भूमिका असलेले असलेली मालिका केलेली होती. ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. किशोर कुमार अशोक कुमारला म्हणाला,” काय बुळ्या सारखे काम करतोस,मा. विठ्ठल सारखे – मर्दासारखे काम करत जा.

अशोक कुमारने किशोर कुमारची इन्कमटॅक्स मधून मुक्तता केली होती. ते लक्षात ठेवून किशोर कुमारने आपल्या थोरल्या भावाचा वाढदिवस 13 ऑक्टोबरला साजरा करायचे ठरविले . वाढदिवसाची तयारी करत असतानाच किशोर कुमारचे दुःखद निधन झाले. अशोककुमारची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करवत नाही. किशोर कुमारचे पार्थिव खांडव्याच्या स्मशानभूमीत नेले. ज्या ठिकाणी एका पाद्रीची कबर होती त्या पाद्रीची जन्म तारीख किशोरकुमारची जन्म तारीख एकच होती ती म्हणजेच 4 ऑगस्ट होय. अशोककुमारचा जन्मदिन किशोर कुमारचा स्मृतिदिन ठरला.किशोरकुमारला आपण पाद्री असल्याचा भास होत असे.तिथेच त्याचा दफन विधी झाला. किशोरकुमारचे भव्य स्मारक मध्यप्रदेश सरकारने खांडव्यात ऊभारले आहे”आपली जाडीलेक प्रीति गांगुली व जावई देवन वर्मा बरोबर बरीच कामे अशोक कुमारने केली आहेत. जरी देवेन वर्माने रूपा गांगुलीशी लग्न केले असले तरीही प्रीती गांगुली बरोबर काम केलय. पारशी कुटुंबातील व्यक्तिमत्व ऊभी केलेली आहेत. त्याचप्रमाणे हमलोग ही महात्मा गांधी वर आधारित मालिका तिचे प्रास्ताविक अशोक कुमार करत असे.आणि हमलोग चे भाषांतर अस पीपल, अस पीपल असेगंमतशीर रूपांतर त्याने केलेले माझ्या लक्षात आहे. चलती का नाम गाडीमध्ये यातील भावाची कामे व गायलेले गीत माइल स्टोन आहे. चलती को गाडी कहते है प्यार हे गीत व हा सिनेमा अतिशय विनोदी आणि अभिनयाची व संगीत अशी जुगलबंदी असा असलेला एक विशेष ठेवा होय.मधुबाला आणि किशोर कुमार यांचे प्रणया राधनावरील चर्चा सर्वत्र गाजत होत्या.

एकूण चार लग्न केली किशोर कुमारने:

  1. रूमादेवी: रूमादेवीपासूनचा अमितकुमार नांवाचा त्याला एक मुलगा आहे, 2. योगिता बाली 3.मधुबाला 4 लीना चंदावरकर. तिच्यापासूनही किशोर कुमारला एक मुलगा आहे.कांही वेळेस लग्नात त्याने धर्म बदलला. चलती का नाम जिंदगी ,बढती का नाम दाढी या सिनेमामध्ये या दोन भावांची कामे केलेली आहेत .आणि विनोदाची जाण असलेले हे सिनेमे अतिशय गाजलेले आहेत किशोर कुमार चे स्वतःचे विनोदी सिनेमा खूपच प्रसिद्धीला पावलेले आहेत. त्याचबरोबर दूर गगन की छाव मे ,दूर का राही असे दुःख परिवारासायी व अगदी गंभीर सिनेमा किशोर कुमारने केले. किशोर कुमार एक अवलिया होता. जीवनात जन्म – मृत्यू अटल आहेत. याची जाणीव त्याला होती. म्हणूनच स्वतःच्या दिवाणखान्यात मानवीसांगाडा होता.त्या सांगाड्याच्या डोक्यावर टोपी व डोळ्यवर चष्मा तो बाहेरून आल्यावर ठेवत असे.तो लहरी होता. वेडसर वाटत असलातरी तो आपणास वेडा ठरवत होता.पैसे मिळाले की नाही याची खात्री तो सेक्रेटरी कडून करीत असे.स्वतः अष्टपैलू असल्याचे आणि कथा पटकथा संवाद गीते दिग्दर्शक निर्मिती पार्श्वगायन त्याचप्रमाणे वितरण तो स्वतः करीत असे. त्यावेळेस सबकुछ किशोर कुमार असे त्याचे बरेचसे सिनेमे लोकप्रिय झाले होते.कलेचे विविध पैलू दाखवले आहेत आणि बहुआयाबी व्यक्तिमत्व बहु ढंगी व्यक्तिमत्व ,बहुरूपी व्यक्तिमत्व याचा अर्थ किशोर कुमारच्या सिनेमामधून आपल्याला बघायला मिळते. अशा प्रकारचे उदाहरण हे सिनेमा सृष्टीमधील किशोर कुमारच्या शिवाय दुसरं दाखवता आले नाही. असाच इतिहासाला दाखला द्यावा लागेल.

ॲड बाबुराव कानडे.
संस्थापक-अध्यक्ष आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान