उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. उदय सामंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 22 जानेवारी हा राम भक्तांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. माझी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहाच्या चालक आणि मालक यांनी नम्र विनंती आहे की उद्या होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रेक्षपण आपल्या चित्रपटगृहात करून सुद्धा या उत्साहात सामील व्हा.
आता उदय सामंत यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच तूफान व्हायरल होताना दिसतंय. उदय सामंत यांनी एक पोस्ट शेअर करत मोठे आव्हान करत विनंती केली आहे. आता उदय सामंत यांच्या या पोस्टवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहे.