सौदी अरेबिया हा देश पाकिस्तान आणि भारत दोघांसाठी महत्त्वाचा देश आहे. भूतकाळात सौदी अरेबियानं पाकिस्तानला अनेकवेळा संकंटातून बाहेर काढलं आहे. भारताबरोबर देखील सौदी अरेबियाचे मोठे व्यापारी संबंध आहेत. यात सर्व गोष्टींचा समावेश आहे. पण, सौदी अरेबिया आणि भारताच्या संबंधांमध्ये एका गोष्टीचा अभाव आहे. बहुधा भारत त्यात कधीही सहभागी होणार नाही. ती गोष्ट म्हणजे, आपण सौदी अरेबियाच्या सुरक्षेची कोणतीही खात्री दिलेली नाही.

तुर्की आणि सौदी अरेबिया या दोन देशांबाबत तुलना केली असता लक्षात येते की , सौदी अरेबियानं पाकिस्तानची जितकी मदत केली आहे, तितक्या प्रमाणात तुर्कीनं कधीही पाकिस्तानची मदत केलेली नाही. सौदी अरेबियाला देखील माहित आहे की तो पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचा आहे.

पाकिस्तानसोबत सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान दोघेही मजबूत संबंध ठेवतात. तथापि, काही वैयक्तिक संबंधांमध्ये फरक आहेत.

सौदी अरेबिया:

सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात मजबूत राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. सौदी अरेबियाने पाकिस्तानला आर्थिक मदत केली आहे आणि काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला.

तुर्कस्तान:

तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक आहेत, ज्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री आहे. BBC नुसार, तुर्कस्तानने पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर पाठिंबा दिला. 

निष्कर्ष:

मागील वर्षी, पाकिस्तानातील रावळपिंडी येथील जनरल मुख्यालयात तिन्ही देशांच्या उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने एका निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या दुसऱ्या बैठकीत संशोधन आणि विकासासह संरक्षण उपकरणे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा झाली.

बैठकीदरम्यान, तिन्ही देशांनी समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी बौद्धिक, तांत्रिक, आर्थिक आणि मानवी संसाधनांचे संयोजन करण्याच्या महत्त्वावर भर दिला. दोन्ही देशांनी त्यांच्या ऐतिहासिक संबंधांची कबुली दिली आणि त्यांचे त्रिपक्षीय सहकार्य वाढविण्याची आणि समान उद्दिष्टांसाठी प्रयत्नांना गती देण्याची गरज यावर भर दिला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्की आणि पाकिस्तानची एकजूट कित्येक दशकांपासून स्पष्टपणे दिसते आहे. दोन्ही देश एकमेकांच्या अंतर्गत प्रश्नांना एकमेकांना पाठिंबा देत आले आहेत. अझरबैजान वरून देखील दोन्ही देश सोबत आहेत.

तुर्की, पाकिस्तान आणि अझरबैजानची मैत्री आर्मेनियाला जड जाते. पाकिस्तान जगातील एकमेव देश आहे, ज्यानं आर्मेनियाला सार्वभौम राष्ट्राचा दर्जा दिलेला नाही.

नागोर्नो-काराबाख या वादग्रस्त प्रदेशावर अझरबैजान दावा सांगतो. पाकिस्तानदेखील त्याला पाठिंबा देतो. याबाबतीत तुर्कीची देखील तीच भूमिका आहे. त्याबदल्यात तुर्की काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देतो.

फेब्रुवारी 2020 मध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोगान, पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मोठ्या अभिमानानं सांगितलं होतं की तुर्कीनं भारतावर 600 वर्षे राज्य केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *