Breaking News

का राधा होतात स्त्रिया ?

हिंदू संस्कृतीप्रमाणे स्त्रीने विवाह करून कुटुंब ,समाज ,रूढी परंपरा जपत पत्नी, आई,आणि अनेक नाती तिने निभावयची असतात.हे सगळे असताना तिच्यातील प्रेमिका ,एक स्वप्नांळू राजकुमारी मात्र हरवून जाते ,काहींचे प्रेमविवाह ही होतात ,तरी ही प्रेमिका ही प्रेमिकाच असते ती पत्नी होवू शकत नाही की पत्नी प्रेमिका होवू शकत नाही ,आता इथे वाटेल मी विवाहबाह्य संबंधांना दुजोरा किंवा प्राधान्य देते की काय ? पण मुळात तुम्ही कोणत्या हेतूने संबंध ,किंवा कोणत्या भावना ,यातना ह्यातून तुमच्या नात्यांची दिशा ठरते ,अशी नाती का निर्माण होतात किंवा करावीशी वाटतात

तर स्त्री ही मुळातच संवेदनशील अशी वृत्तीची पण ती संवेदना किंवा तिचा स्वभाव तुम्ही कसा आजमावता त्यावर तिचं भावनेचे देणे असते ,वाढत्या जबाबदाऱ्या ,कुटुंब विभक्त झालीयेत शारीरिक ,मानसिक त्रास आणि ज्या भावना वडीलधाऱ्या ,अनुभवी ,किंवा खास मित्रमैत्रीणींना सांगितल्या जायच्या ती नातीच आता उरली नाहीयेत ,मग कुठे तरी एकलकोंडेपणा वाढतो ,किंवा असुरक्षित भावना निर्माण होते आणि त्यातून संवेदनांचा उद्रेक होतो आणि मग कोणी तरी आपले हक्काचे असावे ज्याला सगळे सांगता येईल त्याच्या मिठीत मोकळे होता येईल,

प्रत्येकवेळी स्त्रीची शारीरिक गरज नसते ,तिला शाश्वत ,आश्वासक ,विश्वसनीय प्रेम ,शब्द ,स्पर्श हवे असतात त्यात केवळ मनसोक्त रिते व्हायचे असते ,पण स्त्री आणि पुरुष देह एकत्र आले की निसर्गभावना ह्या रित्या होतातच न कळत मग देह ही एकमेकांना समर्पित केले जातात ,ह्यात ही एक निरपेक्ष ,निर्व्याज प्रेमाची अनुभूती असते ,असे असते ते आज प्रत्येक प्रेम करणारी स्त्री देहाचा बाजार मांडून बसली असती ,किंवा ज्या बाजारात बसतात त्या प्रेमिका ठरल्या असत्या ,पण हे जे प्रेम असते ते राधे सारखे ज्यात दुरावा असून ही आपल्यासाठी कोणी तरी आहे ,त्याच्यासाठी सजने ,जगणे ,बोलणे ,रहाणे वागणे ,अशी नुसती कल्पना करून जगला तरी खूप छान भावना निर्माण होतात मनात ,

मी पहिल्यापासून शिवशंकर भक्त त्यामुळे सगळी नाती मी त्याच्याशी जोडलीयेत ,ज्यावेळी एखादी स्त्री राधेप्रमाणे प्रेमिका बनते ना तेंव्हा तिला ही तिचे हक्क ,कर्तव्य ह्याची जाणीव असते तिला माहिती असते ,सामाजिक ,आर्थिक कौटुंबीक मान सन्मान हक्क मिळणार नाहीयेत तरी ही ती निर्लेप,निलाजरी होवून तिचे तन ,मन त्या कृष्णाला देऊन टाकते ,प्रेम ही तारुण्यसुलभ भावना नसून ,मनुष्याच्या अंतिमक्षणा पर्यंत असणारी संवेदना आहे जी माणसाला जगवते ही आणि मारते ही ,ही भावना अशी असते की त्यात कोणतीच याचना ,यातना ,वलग्ना ,नग्नता नसते त्यात असते फक्त असते मन आणि त्याचा आदर

जसे आपण आपल्या जीवाला ,हृदयाला जपतो तसेच त्याच्या किंवा तिच्या मनाला दुःख होणार नाही ह्या गोष्टी टाळणे ,नी केवळ शब्दांनी ,नजरेने ,स्पर्शाने आत्म्याशी अधिकाधिक जवळीक कशी निर्माण होईल ही एक अलवार भावना असते ,खरी प्रेमिका कधीच प्रेमाचे अवडंबर करत नाही की हक्काची मागणी करत नाही की तिच्यामुळे प्रियकराच्या कुटुंबात क्लेश ,तेढ निर्माण होतील असे वागत नाही आणि मी म्हणते प्रत्येक प्रेमींनी असेच वागले पाहिजे कारण प्रेम हे दोन मन आत्मे ह्यांच्यात असते ,त्यांच्याभोवती असणारे जग हे एक चक्रव्यूह असते ते भेदत असताना त्यातून अलगद निसटता ही आले पाहिजे निसटने म्हणजे कोणत्या नात्याला ,सामाजिक ,विचार ह्यांना धक्का लागता कामा नये ,प्रेम हे आत्म्याशी संवाद असतो ,तो कधीच नाती जोडत नाही ना जगाला जोडतो ,

कारण प्रेम अशी भावना जी कोटी लोकांमधून एका खास व्यक्तीशी त्याच्या तारा जुळतात ,कारण पूर्वजन्म किंवा काही खरेच ऋणानुबंध असतील म्हणून अशी लोक एकत्र येतात ,पण हल्ली ह्या प्रेमाचे व्यावसायिककरण झाले ,अनेक कुटुंबे उध्वस्त झालीयेत अनेक संसार मोडलेत कारण प्रेम ही भावना चुकीच्या संकल्पनेत बसवली मांडली त्यामुळे समाजात राधाकृष्ण प्रेम मान्य म्हणण्यापेक्षा लोकांनी विवाहबाह्य संबंध हे नाव देऊन प्रेमाची अढी निर्माण केली ,स्त्रीप्रमाणे पुरुषाला ही अशा नात्यांची गरज भासते ,कारण सखी,प्रेमिका हीच्याशी जे मुक्त बोलू शकतो तसे पत्नीशी नाहीच बोलू शकत कारण पत्नी हे नातं धर्माने निर्माण झालेले आणि धर्माला धरून चालताना मुक्त ,रिक्त राहता येत नाही काही बंधन असते,त्यामुळे धर्माची नात्यांना हक्क आणि कर्तव्य ह्याला एक अदृश्य कोंदण आहे तर प्रेमाला मुक्त स्वैर असा आनंद जो फक्त नी फक्त दोन प्रेमळ आत्मेच अनुभवू शकतात.

पल्लवी फडणीस,भोर ✍🏻