Breaking News

वंचित जरांगेची मदत घेणार, जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला उमेदवारी; यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी काही उमेदवारांची नावे वाचून दाखवली. यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. बुलढाण्यातून वसंत मगर, सांगलीतून प्रकाश शेंडगे, भंडाऱ्यातून संजय केवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही ओबीसी, जैन, मुस्लीम उमेदवार देणार आहोत. गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाईल.

जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या संघटनेसोबत आम्ही सहयोग करणार आहोत. त्यांनी ३० तारखेपर्यंत थांबा असं सांगितलं आहे, असं आंबेडकर म्हणाले. याशिवाय वंचितकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे वंचितने मविआसोबत संबंध तोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंचितच्या उमेदवारांची यादी

भंडारा गोंदिया- संजय केवत

गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी

चंद्रपूर – राजेश बेल्ले

बुलढाणा- वसंत मगर

अकोला- प्रकाश आंबेडकर

अमरावती- कुमारी प्राजक्ता पिल्लेवान

वर्धा- राजेंद्र साळुंके

यवतमाळ वाशिम- खेमसिंग पवार