Month: March 2025

महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात दिसत आहे उष्णतेची लाट ; सर्वाधिक तापमानाची नोंद ‘या’ शहरात

राज्यात उष्णतेत वाढ झालेली दिसून येत आहे. आज पुण्यात लोहगावमध्ये तापमान 39.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. शिवाय सोलापूरचे तापमान ही 40 अंशाच्या जवळपास होते. हे कडक उन्हाळ्याचे लक्षण मानले जाते.…

हिटलरचं नाव घेत ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले …

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते मुलूंडमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. म्हणाले , ” माझे आजोबा म्हणायचे, दगडाला शेंदूर लावला तर तो…

जिंकलो !! भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव!

भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभव केला. जडेजाने ४९व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत संघाला विजय…

कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानी एजंटची बलुचिस्तानमध्ये हत्या!

इराणमधून माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेला मदत केल्याचा आरोप असलेल्या एका पाकिस्तानी एजंटची शुक्रवारी रात्री अशांत बलुचिस्तान प्रदेशात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून…

दिल्लीत महिलांना दरमहा मिळणार २५०० रुपये! महिला समृद्धी योजनेला सरकारची मंजुरी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भारतीय जनता पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. दिल्ली शरकारने महिला समृद्धी योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महिन्याला २५०० रूपयांची आर्थिक मदत दिली…

मोठी बातमी ! रोह्यातील वणव्यात 44 घरांची राखरांगोळी

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसईमधील डोंगरमाथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या वणव्याने अख्खं गाव बेचिराख करुन टाकलंय. या वणव्यात 44 घरं, 15 गोठे आणि एक शाळा जळून खाक झाली…

पुण्यात आलिशान गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरूणाची लघुशंका ; व्हिडीओ व्हायरल

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. गेल्यावर्षी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवत दुचाकीला धडक दिली होती. यात दोन…

ट्रम्प यांच्या ‘टेरिफ टेररिझम’मुळे जगात आर्थिक दहशतवाद वाढतोय – रामदेवबाबा

महिला पतंजली योग समितीतर्फे कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय महिला महासंमेलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ट्रम्प यांच्यासह जगभरातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानवतेला कलंकित करणारे व्यक्तिमत्व आहे. जगभरातील…

महिलादिनी देवेंद्र फडणवीसांनी केला महिला जागर; लेकीचा उल्लेख करत म्हणाले…

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून महिला जागर केला जात आहे. विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या कार्याचे गोडवे गायले जात आहेत. आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक…

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश…

हिंगोली जिल्हयातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार गट, उबाठा आणि कॉंग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. आमदार…