kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेत्री करिष्मा कपूरच्या माजी नवऱ्याचा मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का

अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटीत पती आणि उद्योजक संजय कपूर यांचं वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी जाऊन मधमाशीनं चावा घेतला. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी संजय कपूर याच्या निधनाची पुष्टी केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या X (पूर्वीचे ट्विटर) वर भावनिक पोस्ट करून त्यांनी दुःख व्यक्त केले. “संजय कपूर याच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले: आज सकाळी इंग्लंडमध्ये त्याचे निधन झाले, हे खूप मोठे नुकसान आहे. त्याच्या कुटुंबियांना आणि सोनकॉमस्टारमधील सहकाऱ्यांना माझी मनापासून संवेदना.. ओम शांती.” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं.

अशातच सध्या संजय कपूर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण, पुढे काही तासांतच त्यांचं निधन झालं.

संजय कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केलेल्या.

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना संजय कपूर यांनी लिहिलं की, “अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. देव त्यांना कठीण काळात शक्ती देवो.”

2003 मध्ये संजय कपूरनं करिश्मा कपूरशी लग्न केलं. दरम्यान, हे लग्न फक्त 13 वर्ष टिकलं. 2016 मध्ये, घरगुती हिंसाचाराच्या आरोपांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनाही दोन मुलं आहेत, एक मुलगी समायरा आणि मुलगा कियान. दोघांचीही कस्टडी आता करिश्मा कपूरकडे आहे. घटस्फोटानंतर संजय कपूरनं प्रिया सचदेवशी लग्न केलं आणि दोघांनाही एक मुलगा आहे. सध्या तो मुलगा सात वर्षांचा आहे.

संजय कपूर नामवंत उद्योगपती होते. ते सोना कॉमस्टारचा चेअरमन होते. भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या लीडर्समध्ये त्यांची गणती व्हायची. त्यांना पोलो खेळण्याची खूप आवड होती, तसेच ते सोना पोलो संघाचा मालक देखील होते आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी या खेळात सक्रिय सहभाग घेतला होता.