पुणेकर नागरिकांना सुट्टीच्या काळात खरेदी व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल सेन्ट्रल पार्क प्रांगण, आपटे रोड, डेक्कन जिमखाना येथे आयोजित ३ दिवसांच्या खरेदी महोत्सव व खाद्य जत्रेचे शेकडो पुणेकरांच्या उदंड प्रतिसादात दीपप्रज्वलन करून उद्घाटन संपन्न झाले. यावेळी श्रीकृष्ण चितळे, निवेदिता एकबोटे ,उर्मिला आपटे,पराग आपटे,स्नेहा आमडेकर,सुप्रिया दामले,अजय दाते ,अजित राजमाचीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


हे प्रदर्शन व खाद्यजत्रा ७ एप्रिल पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील. यामध्ये ६० हून अधिक स्टॉल आहेत ,त्यामध्ये साडी, ड्रेस मटेरियल्स, बँग्ज, इमिटेशन ज्वेलरी, पर्स, कॉस्मेटीकस, परफ्यूम्स, आयुर्वेदक औषधे, तेले, कोकण प्रॉडक्टस, विदर्भ मसाले, मुखवास, चटण्या, केक आणि हस्तकला साहित्य यांचे प्रदर्शन व विक्री असेल. खाद्यपदार्थांमध्ये उकडीचे मोदक, कैरीची डाळ व पन्हे, सरबत, सोलकढी, पराठे तसेच विविध महाराष्ट्रीयन पदार्थ यांची मेजवानी पुणेकरांना मिळेल. दि. ९ एप्रिल रोजी असणाऱ्या गुढीपाडवा सणानिमित्त याचे अयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून यातील ५ स्टाँल अपंग, अंध, आणि वयस्करांना मदत करणाऱ्या संस्थाना संयोजकांतर्फे देण्यात आले आहेत . परगावाहूनही महिलांचे गट यात सहभागी झाले असून दर्जेदार उत्पादने तुलनेने कमीदरात येथे उपलब्ध असतील.