kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अनंत-राधिका संगीत सोहळा : धोनी आणि साक्षीची ‘संगीत समारंभा’ला हजेरी

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव म्हणजेच अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी होत आहे. अनंत अंबानी आणि राधिक राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला आतापासून सुरुवात झाली आहे. आता भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या ‘संगीत समारंभात’ सहभागी होण्यासाठी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचला. धोनी आणि साक्षीचा हा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.

अलीकडेच साक्षी आणि माहीने त्यांच्या लग्नाचा १५वा वाढदिवस साजरा केला. साक्षी आणि धोनीची जोडी चाहत्यांना खूप आवडते. साक्षी आणि धोनी एकमेकांचे बालपणीचे मित्र आहेत. या जोडप्याची रंजक प्रेमकथा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या लग्नाला नुकतीच १५ वर्षे पूर्ण झाली. धोनी दाम्पत्याला झिव्हा नावाची एक लेक देखील आहे. IPL मध्ये अनेकदा झिव्हा आपल्या बाबाला चीअर करण्यासाठी येत असते. तसेच, धोनी आणि साक्षी देखील अनेकदा IPLच्या मैदानावर जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त करत असतात.

दरम्यान, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून मोठ्या कालावधीपर्यंत टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली.