Breaking News

आवडीनं केलेली हेअरस्टाइल सांगते तुमचा स्वभाव; काय सांगतं ज्योतिषशास्त्र?

प्राचीन काळापासून स्त्रिया आपल्या सौंदर्याबाबत सजग असलेल्या पाहायला मिळतात. सौंदर्य प्रसाधनांपासून ते पेहरावापर्यंत सर्वच बाबतीत स्त्रियांना आकर्षण असते. महिलांचे सौंदर्य वाढवण्यात आणखी एक गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते. ती गोष्ट म्हणजे महिलांचे केस होय. केसांमुळे स्त्रियांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. काही महिलांना लांबलचक केसांची आवड असते. तर काही महिलांना अगदी छोटे केस पसंत असतात. सध्याच्या जगात ट्रेंडनुसार महिला विविध हेअरस्टाईल करत असतात. इतकेच नव्हे तर अनेक महिला केमिकल प्रक्रियेद्वारे केसांचे रंगसुद्धा बदलत असतात. या सर्वांमध्ये आणखी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ज्योतिष शास्त्रानुसार महिलांच्या केसांवरून त्यांचा स्वभाव समजतो. केसांच्या रचनेनुसार कोणत्या महिलेचा स्वभाव कसा असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कुरळे केस

कुरळ्या केसांच्या महिला अत्यंत रोमांचक आणि उत्साही स्वभावाच्या असतात. या महिलांना आपल्या केसांच्याबाबतीत फारशी काळजी नसते. घरातील अगदी सोप्या सोप्या उपायांनी या स्त्रिया आपल्या केसांची काळजी घेतात.

नागमोडी वळणाचे केस

अशा केसांना वेव्ही हेअरस्टाईल म्हणूनही संबोधले जाते. अशाप्रकारचे केस असणाऱ्या महिला प्रचंड रचनात्मक आणि कलाकार स्वरूपाच्या असतात. या स्त्रिया मोठी स्वप्ने पाहतात. शिवाय ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती धडपड करतात. या स्त्रिया शारीरिकदृष्ट्या अत्यंत सक्रिय असतात.

स्ट्रेट आणि सिल्की केस

स्ट्रेट आणि सिल्की केस असणाऱ्या स्त्रिया स्टायलिश असतात. या स्त्रिया स्वभावने गंभीर आणि शांत असतात. या स्त्रियांना विनाकारण बडबड करणे पसंत नसते. त्यांना आपल्या करिअरची काळजी असते.

लांब केस

नैसर्गिकरित्या लांबलचक केस असणाऱ्या स्त्रिया अत्यंत आकर्षक असतात. या स्त्रियांना कोणत्याही प्रकारची वेगळी हेअरस्टाईल करायची आवश्यकता नसते. या स्त्रियांना स्वातंत्र्याची प्रचंड गरज असते.

लहान केस

लहान केस असणाऱ्या महिला स्वतंत्र विचाराच्या असतात. या स्त्रियांना आपले निर्णय स्वतः घेणे पसंत असते. या स्त्रिया अत्यंत सर्जनशील असतात. शिवाय त्यांना वारंवार हेअरस्टाईलिस्टकडे जाऊन हेअरकट करणे पसंत असते.