kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सुपरस्टार सिंगर 3 च्या सेमी-फिनालेमध्ये अथर्व बक्षीच्या जबरदस्त परफॉर्मन्सनंतर महान संगीतकार विजू शाह यांनी त्याला दिले आलिंगन

या वीकएंडला, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने स्वतः विकसित केलेल्या सुपरस्टार सिंगर या लहान मुलांच्या गायन रियलिटी शोच्या तिसऱ्या सीझनची उपांत्य फेरी रंगणार आहे. स्पर्धेतील गुणी छोटे उस्ताद आपल्या गायकीने सर्वांना प्रभावित करून सुपरस्टार सिंगर 3 चा किताब जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतील. महान संगीतकार विजू शाह यांच्या उपस्थितीमुळे हा सेमी फिनाले अधिकच रंगतदार होऊन जाईल. या शनिवारी ‘कल्याणजी-आनंदजी’ विशेष भागात बच्चापार्टीला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणजींचे सुपुत्र विजू शाह प्रत्यक्ष हजर असणार आहेत.

यावेळी ‘अकेले हैं चले आओ’ आणि ‘श्रीवल्ली’ ही गाणी सादर करून झारखंडच्या अथर्व बक्षी या छोट्या उस्तादाने पुन्हा एकदा सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. त्याचा आकर्षक आवाज ऐकून विजू शाह विजू शाह स्वतःचा आनंद रोखू शकले नाहीत आणि मंचावर जाऊन त्यांनी अथर्वला घट्ट मिठी मारून आपली भावना व्यक्त केली. अथर्वला दाद देताना विजू शाह म्हणाले, “अथर्व मला तुला घट्ट मिठी मारायची आहे. तू इतकं छान गायलास! तुला परफॉर्म करताना पाहून मला छोट्या जावेद अलीची आठवण झाली, जो ‘श्रीवल्ली’ गाण्याचा मूळ गायक आहे. तो जेव्हा तुझ्या वयाचा होता, तेव्हा माझ्या वडीलांकडे गाणे शिकायला येत असे.”

सुपर जज नेहा कक्कड अथर्वचे कौतुक करताना म्हणाली, “‘अकेले हैं चले आओ’ आणि ‘श्रीवल्ली’ ही दोन्ही गाणी मंचावर सादर करण्यास कठीण आहेत, एखादा कसलेला गायकच हे करू शकेल. आज तू जे केलेस ते अत्यंत कौतुकास्पद होते. अथर्वची निष्ठा त्याच्या परफॉर्मन्समधून नेहमीच दिसते. अथर्वचा परफॉर्मन्स पाहताना हे स्पष्ट जाणवत होते की, त्याने जावेद अलीच्या शैलीचे बारकाईने निरीक्षण केले आहे आणि या गाण्यात ती शैली सादर करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्याने गाण्याला उत्तम न्याय दिला. तो मनापासून गायला. आणि अथर्वमध्ये मला आज एक वेगळेच व्यक्तिमत्व दिसले. अथर्वच्या प्रवासाच्या सुरुवातीस मी हे पाहिले आहे की, तो इतका नाजुक आणि छोटा होता, पण अशीच अवघड अवघड गाणी म्हणण्याचा प्रयत्न करायचा. त्याने दिलेला प्रत्येक परफॉर्मन्स अप्रतिम होता. त्याला परफॉर्म करताना पाहून मी दर वेळेस नखशिखांत शहारते. एखाद्या स्पर्धकाचा प्रवास कसा असावा याचे तो एक उत्तम उदाहरण आहे.”
  
हा परफॉर्मन्स आणि इतर बरेच काही अनुभवण्यासाठी बघा, सुपरस्टार सिंगर 3 दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!