kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुण्यातील गोरान ग्रॉसकॉफ फॅमिली क्लिनिकचा दि. ११ रोजी १३वा वर्धापनदिन

पुण्यातील प्रतिष्ठित गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक, ज्याची पालक संस्था ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ आहे, दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी आपला १३वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करीत आहे. हा कार्यक्रम ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चांदणी चौक येथील वेद भवनजवळील बिरगीट्टा ग्रॉसकॉफ सभागृह येथे आयोजित करण्यात येणार असून, या विशेष प्रसंगी पद्मश्री लीला पूनावाला या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थिती म्हणून अभिनेत्री गौतमी देशपांडे कार्यक्रमास येणार आहेत.

तसेच डॉ. संजीवनी कुलकर्णी या ‘तरुण-तरुणींसोबत परस्पर नातेसंबंध, प्रेम, आकर्षण आणि मैत्री’ या विषयांवर एक मनोरंजक संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात मिलिंद देशपांडे हे ‘भटकंती आणि व्यक्तिमत्त्वविकास’ या विषयावर आपले विचार मांडतील. याशिवाय गोरान ग्रॉसकॉफ फॅमिली क्लिनिकच्या अध्यक्षा फ्रेनी तारापोर अनुभवाचे बोल आणि उपाध्यक्षा गीतांजली देशपांडे या संस्थेच्या वाटचालीबद्दल आपले विचार व्यक्त करतील.

या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थितीत राहणार आहेत.