Breaking News

चहा-कॉफीच्या पिण्याचे व्यसन सोडवायचे आहे ? पहा ‘या’ टिप्स मदत करतील

सकाळच्या चांगल्या सुरुवातीपासून दिवसाचा थकवा दूर करण्यापर्यंत अनेक लोक बहुतेक वेळा एक कप चहा किंवा कॉफीवर अवलंबून असतात. अशावेळी जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्रेमी असाल तर ते पिण्याची एकही संधी तुम्ही सोडणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का की चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि तुम्ही आजारी पडू शकता. चिंतेची बाब म्हणजे या सवयीमुळे आरोग्याला होणारे नुकसान बहुतांश चहा-कॉफी पिणाऱ्यांनाही चांगलेच ठाऊक आहे. जास्त चहा प्यायल्याने डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, थकवा, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य अशी लक्षणे दिसू शकतात. असे असूनही त्यांना हे व्यसन सोडता येत नाही. जर तुमचीही अशीच परिस्थिती असेल तर चहा-कॉफीच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

चहा आणि कॉफीच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी टिप्स :

कॅफिन सेवनाचे प्रमाण कमी करा

कॅफिनचे सेवन हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही दिवसभरात ७-८ कप चहा पित असाल तर दररोज एक कप कमी चहा पिण्याचा प्रयत्न करा. हा नियम काही दिवस पाळावा.

डॉक्टरांचा सल्ला

चहाच्या व्यसनातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. चहाच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी शारीरिक- मानसिक तंदुरुस्ती राखण्याबरोबरच शरीराला डिटॉक्सिफाय करण्याचा योग्य सल्लाही डॉक्टर देऊ शकतात.

पुरेशी झोप

चहाचे सेवन बंद केल्याने व्यक्तीच्या शरीरात थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. अशावेळी शरीराची एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी तुमची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

चहापत्तीचा कमी वापर

चहामधील कॅफिनचे प्रमाण कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चहा बनवताना चहापत्तीचा वापर कमी करणे. आपण आपल्या चहामध्ये थोड्या प्रमाणात चहापत्ती घालण्याची खात्री करा. असे केल्याने तुमचे चहाचे व्यसन हळूहळू कमी होईल.

डिटॉक्स ड्रिंक्सचा आधार घ्या

डिटॉक्स ड्रिंक्सला आपल्या रूटीनचा भाग बनवल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि कॅफिनची लालसा कमी होते.