३६व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्य ‘जाऊ देवाचिया गावा’ श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर करण्यात आले. संजय भोसले यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या नाट्याचे संगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी केले होते. प्रख्यात गायक सुरेश वाडकर, आनंद भाटे, देवकी पंडित आणि त्यागराज खाडिलकर यांच्या रेकॉर्डेड सुमधुर गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते ४० कलाकारांनी सादर केलेली मयूर वैद्य यांच्या नृत्य दिग्दर्शनाखालील नृत्ये आणि रंगमंचावरील पारंपरिक गावाच्या वातावरणाची अनुभव देणारी देखणी सजावट. ग्राम्य जीवनाचा सुंदर अनुभव देणाऱ्या या सजावटीने संपूर्ण प्रेक्षागृह मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल व मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी कलाकारांचे सत्कार केले.