इस्रायलचे लष्कर लेबनॉन आणि गाझामध्ये हिजबुल्लाह आणि हमासविरोधात लढत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये एकाच वेळी १६०० लक्ष्यांवर हल्ले केले आणि हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले होते. सोमवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर आठवडाभरातील दुसरा मोठा हल्ला करत इस्त्रायलमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या हायफावर १३५ ‘फादी १’ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या १२० तळांवर बॉम्बहल्ला करून उद्ध्वस्त केले.

इस्रायलच्या लष्कराने सोमवारी केलेल्या व्यापक हल्ल्यांचा भाग म्हणून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या १२० हून अधिक तळांवर ६० मिनिटांच्या कालावधीत हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. हवाई दलाने एका तासात दक्षिण लेबनॉनमधील १२० हून अधिक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

इस्रायलमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या हायफावर हिजबुल्लाहने सोमवारी रॉकेट डागले. गाझामध्ये इस्रायलशी लढणाऱ्या हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेचा मित्र देश असलेल्या इराणसमर्थित हिजबुल्लाहने हायफाच्या दक्षिणेकडील लष्करी तळाला १३५ ‘फादी १’ क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. इस्रायली लष्कराने सांगितले की, सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत इस्रायली भागात बॉम्बहल्ला करण्यात आला. मध्य इस्रायलमधील हायफा भागात दहा तर दक्षिणेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबरला केलेला हल्ला हा पॅलेस्टिनींसाठी टर्निंग पॉईंट असल्याचे इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांनी म्हटले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे – “अल-अक्सा” ऑपरेशनने झायोनिस्ट राजवट ७० वर्षे मागे ढकलली आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने दक्षिण इस्रायलमध्ये २० मिनिटांत पाच हजारांहून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती आणि त्यात १२०० लोक ठार झाले होते. यानंतर त्यांनी सीमेवर घुसखोरी करून निर्घृण नरसंहार केला. २५० हून अधिक लोकांना बंधक बनवले गेले आणि शेकडो लोक मारले गेले.

लेबनॉनमधील विविध भागात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ११ जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. लेबनॉनमधील अधिकृत आणि लष्करी सूत्रांनी सोमवारी सांगितले की, रविवारी रात्री इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ११ लेबनानी ठार तर १७ जखमी झाले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, माऊंट लेबेनॉन प्रांतातील एले जिल्ह्यातील कायफोन गावातील निवासी इमारतीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात सहा जण ठार तर १३ जण जखमी झाले आहेत. इस्रायलच्या आणखी एका हवाई हल्ल्यात पाच जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *